कित्येक संस्था वाचन शिकवण्यासाठी डिजिटल माध्यमाच्या वापराची प्रसिद्धी करण्यात अशा काही गुंग झाल्या आहेत की, त्यांना क्षणभर थांबून थोडा विचार करा, असं म्हणणंसुद्धा वादात पडल्यासारखं वाटतं
ज्यांना वाचता येत नाही, त्यांना आपण ‘अशिक्षित’ म्हणतो; पण वाचता येत असूनही वाचत नाहीत, त्यांना काय म्हणायचं? आणि वाचतात पण वाचलेलं कळत नाही, असेही आहेतच की! या पुस्तकात या दोन समस्यांचा विचार केला आहे. पहिली आहे वाचनाच्या सवयीचा अभाव आणि दुसरी आहे, न समजता केलं जाणारं वाचन. या दोन्ही समस्यांचं मूळ खरं तर आपल्या शिक्षण पद्धतीतच आहे.......